उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जिल्हधिकाऱ्यांकडे लेखी मागणी
*💫ओरोस दि२७-:* नुकत्याच झालेल्या पर्जन्यवृष्टि वेळी जिल्ह्यात महापुर आला होता. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हाणी झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यात जलप्रलय आले असले तरी याला प्रमुख कारण आहे, जिल्ह्यातील नदी, नाले गाळाणे भरलेले असणे. जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांचे गाळ ताबडतोप काढण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. याचबरोबर त्यांनी तौक्ते मदत मिळालेली नाही, याकडेही जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. उपाध्यक्ष म्हापसेकर यानी दिलेल्या निवेदनात, मागील आठवडयात सिंधुदुर्ग जिल्हयात सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात अतिवृष्टी झालेने पुराचे पाणी वाडी, वस्तीत तसेच बाजारपेठेत घुसून लोकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व नदीपात्रातील मोठया प्रमाणात साचलेला गाळ तसेच झाडे झुडपे, हे आहे. गेली अनेक वर्षे या नदीपात्रातील गाळाचा उपसा झालेला नसल्याने नद्यामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याअनुशंगाने आपणास विनंती करणेत येते की जिल्ह्यातील सर्वच नदीपात्रातील गाळ उपसा करुन तो अन्यत्र हलवीणेत बाबत कार्यवाही आपल्या स्तरावरुन करणेत यावी. जेणेकरुन पाण्याचा निचरा होऊन नदीकिनारी शेतक-यांचे तसेच व्यापा-यांचे नुकसान होणार नाही, असे नमूद केले आहे. उपाध्यक्ष म्हापसेकर यानी दिलेल्या दुसऱ्या निवेदनात, मे 2021 मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. सद्यस्थितीत घरे व गोठयाचे नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. मात्र भातशेतीचे, फळबागांचे वादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडांच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण होऊनही अद्यापही शेतक-यांच्या, फळबागातदारांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी, फळबागायतदार हवालदील झालेला आहे. तरी कृपया नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांच्या, फळबागायतदारांच्या खात्यावर त्वरीत जमा करणेत यावी, अशी मागणी केली आहे. आरवली शिरोडा, रेडी नमसशेंडा बंधा-यातील व गोठणा नदीपात्रातील गाळ काढावा जिल्हा परिषदेच्या कृषि समिती सभेत वेंगुर्ले तालुक्यातील आरवली नमसशेंडा बंधारा व वैभववाडी तालुक्यातील गोठणानदी (व्हेळकरवाडी ते नाधवडे धरण) यातील गाळ काढण्यासाठी वारंवार मागणी केली जाते. या दोन्ही ठिकाणची पहाणी उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि.प. उपविभाग ल.पा. वेंगुर्ले व उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग फोंडाघाट ता. कणवकली यांचे समवेत जि.प.सदस्यांनी केलेली होती. सदर दोन्ही ठिकाणच्या संयुक्त पहाणीच्या अहवालाच्या छायांकीत प्रती या सोबत उचीत कार्यवाहीसाठी आपल्याकडे सादर करणेत येत आहे. तरी दोन्ही ठिकाणचा गाळ तात्काळ काढणेबाबत आपले स्तरावरुन कार्यवाही होणेस विनंती आहे, असे तीसरे स्वतंत्र निवेदन दिले आहे.
