उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभण्यासाठी घातला दुग्धाभिषेक

महाराष्ट्र संकटमुक्त होऊ दे…शिवसैनिकांचे श्री देव स्वयंभूकडे साकडे

*💫कणकवली दि२७-:* महाराष्ट्रावर लागोपाठ संकटे येत आहेत. ही संकटांची मालिका संपून राज्य संकटमुक्त होऊ दे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळून जनतेची सेवा करण्यासाठी बळ मिळू दे, असे साकडे कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू चरणी शिवसैनिकांनी घातले. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्यावतीने श्री देव स्वयंभूला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी श्री देव स्वंयभूकडे उद्धव ठाकरे यांना जनतेची सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य लाभू दे, अशी प्रार्थना केली. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख शेखर राणे, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, विलास गुडेकर, संदेश सावंत-पटेल, प्रसाद अंधारी, तेजस राणे, सुजित जाधव, भूषण परूळेकर, बाबू जाधव, संतोष राणे, महेश राणे, रुपल परब, समीर सावंत, योगेश मुंज, सोहम राणे, माधवी दळवी, प्रतिभा अवसरे, सुवर्णा राणे, दिव्या साळगावकर, साक्षी आमडोस्कर, अश्विनी मोर्ये, दामू सावंत, प्रमोद पिळणकर, अरुण परब, रवी भंडारी, श्री. सुद्रीक, रुपेश साळुंखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page