पूरग्रस्तांना आपत्कालीन दहा हजाराची मदत द्या

भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी चिपळूण प्रांत अधिकार्‍याकडे केली मागणी

कणकवली 26 जुलै अतिवृष्टीमुळे महापुराचे पाणी घर, दुकानांमध्ये शिरल्यामुळे जनतेचे व व्यापाऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे. 48 तासांपेक्षा जास्त काळ चिपळूणमधील व्यापारी व नागरिकांच्या घरात पाणी राहिल्याने शासकीय नियमानुसार आपत्कालीन निधी म्हणून या नागरिक व व्यापाऱ्यांना तात्काळ आपत्कालीन निधी म्हणून प्रत्येकी दहा हजाराची मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकार्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page