Headlines

मल्हार पुलासाठी आम.नितेश राणे यांनी बांधकाममंत्री नाम.चव्हाण यांचे लक्ष वेधले

पूल तातडीने बांधण्यासाठी मंजूरीची कार्यवाही करण्याची केली मागणी

*💫कणकवली दि२६-:* कनेडी ते नाटळ या गावांना जोडणारा मल्हार नदीवरील पूल तातडीने बांधण्यासाठी मंजूरीची कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे), कुपवडे ,कडावल ,नारूर ,वाडोस ,शिरशिंगे कलंबिस्त, वेर्ले ,सांगेली ,धवडकी, दाणोली ओटवणे ,विलवडे ,बांदा असा सह्याद्री पायथ्यासून जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुलाला मंजुरी मिळावी अशी मागणी केली आहे. आम.नितेश राणे यांनी नाम.अशोक चव्हाण यांना पत्र दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की,माझ्या मतदारसंघातील कणकवली तालुक्यातील रा.मा.क्र .१ ९ ० कनेडी ते नाटळ या गावांना जोडणारा मल्हार पूल हा २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेला आहे . त्यामुळे परिसरातील सुमारे १० ते १५ गावातील जनतेचा मुख्य रस्त्याशी होणारा संपर्क तुटला आहे . त्यामुळे परिसरातील जनतेची फार मोठी गैरसोय होणार आहे . तरी सदरहू पूल तातडीने बांधणेसाठी मंजूरीची कार्यवाही व्हावी असे मागणी पत्र आमदार नितेश राणे यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे.

You cannot copy content of this page