राजन तेली यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
*💫वेंगुर्ले दि.२६-:* भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने अतिवृष्टीमुळे अन्नधान्याचे तसेच कपड्यालत्त्याचे नुकसान झालेल्या कातकरी समाजातील लोकांना ब्लँकेटचे वाटप करुन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला . वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कॅम्प भागात रहाणारी कातकरी समाजातील लोकांचे अतिवृष्टीमुळे फार नुकसान झाले . झोपडीमध्ये पाणी शिरुन अन्नधान्यासहीत कपडेलत्ते भिजुन गेले . ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक भावनेतून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ३० ब्लँकेट चे वाटप नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.चिटनीस जयंत मोंडकर , अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर काणेकर इत्यादी उपस्थित होते .
