*💫कणकवली दि.२४-:* ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडेचा शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी) परीक्षेचा निकाल १००% लागला आहे. यामध्ये कु.शाल्मली नानल ९९.८० % गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला, कु.प्रियांका आनंद पारकर हिने ९७.२०% गुण व कु.मंदार दिगंबर सावंत ९६.२०% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. या गुणवंत विद्यार्थ्याचा ज्ञानदा शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक केले. तसेच शिक्षकांचा सत्कार केला यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्रा.हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, संचालक मनीषा मोहन सावंत, सल्लागार डी. पी. तानावडे, आयडियलच्या मुख्याद्यापीका अर्चना शेखर देसाई व मंदार आनंद मुंडले उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्था चालक यांच्यातील सुसंवाद शिक्षकांचे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, परीक्षांचा सराव यामुळे हे यश मला मिळाल्याचे कु.शाल्मली नानल हिने आपल्या मनोगतात व्यक्त केले, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात करियर करणार असल्याचे सांगितले. कु.प्रियांका पारकर हिने शिक्षकांचे आणि पालकांचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले, वैद्यकीय क्षेत्रात करियर करणार असंल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ.विद्याधर तायशेटे, प्राध्यापक हरिभाऊ भिसे, मोहन सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, शेवटी सर्वांचे आभार प्राध्यापक निलेश महेंद्रकर यांनी मानले.
आयडियल इंग्लिश स्कूलच्या एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव
