बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली घटनेची माहिती
💫कणकवली दि.२२-: सांगवे-केनेडी नाटळ येथील मल्हार नदीवरील वाहून गेलेलेल्या पुलाची पाहणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. नाटळ, दारीस्ते,दिगवळे,नरडवे या गावांना जोडणार हा मुख्यपूल असल्याने या सर्वच गावांचा संपर्क तुटलेला आहे.कोसळलेल्या पुलाची पाहणी करून आम.नितेश राणे यांनी त्याच ठिकाणाहून बांधकाम चे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून परिस्थितीची माहिती दिली.तसेच रस्ते सचिव श्री.डेबडवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व होणाऱ्या गैरसोयी लक्षात आणून दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,बांधकाम कार्यकारी अभियंता संजय शेवाळे,सरपंच व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
