वाघोटन नदीने ओलांडली इशारापातळी…

💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: आज सायंकाळी 4 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली असून खारेपाटण पुलाजवळ या नदीची पातळी 8.900 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

वाघोटन नदीची इशारा पातळी 8.500 मीटर आहे तर धोका पातळी 10.500 मीटर आहे. तर भंगसाळ पुलाजवळ मोजण्यात आलेल्या कर्ली नदीच्या पाणीपातळीनुसार या नदीची पातळी 9 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर असून धोका पातळी 10.910 मीटर आहे. कर्ली नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.300 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे.

You cannot copy content of this page