गटनेत्या अनारोजीन लोबो यांचा गौप्यस्फोट
💫सावंतवाडी दि २२-: राणेंच्याबाबतीत नगराध्यक्ष संजू परब यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आमदार नितेश राणे सावंतवाडीत आले त्यावेळी त्यांनी आपल्याला नगराध्यक्ष संजू परब यांच्या भानगडी बाहेर काढा, अस सांगितल, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी केला.
ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दिपाली सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, येत्या निवडणूकीत सावंतवाडीची जनताच तुम्हाला उत्तर देईल. असेही लोबो म्हणाल्या.
ईडी लावा हा सर्वांत मोठा विनोद असून हा जिल्ह्यातला आणि कोकणातला विनोद आहे. ज्याचे पडसाद मुंबईतही उमटले. आमदार दीपक केसरकर यांच्यावर ईडी लावा, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले, मात्र त्यांचेच केंद्र सरकार ईडी ग्रस्त सरकार आहे असा जोरदार हल्लाबोलही शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.
