बांधकाम व्यावसायिक मुदस्सरनजर शिरगावकर यांची सामाजिक बांधिलकी

देवगड येथील कोविड केअर सेंटरला साहित्य भेट

*💫देवगड दि.२१-:* कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढता आहे.हा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी असून देखील आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत अशा वेळी अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्ती उद्योजक या कोरोना कालावधीतही आरोग्य सेवेला वेळोवेळी सहकार्य करत आहेत. कणकवली येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मुदस्सरनजर शिरगावकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन देवगड येथील कोविड केअर सेंटरला मास्क,सॅनिटायझर,हँडग्लोज, इंजेक्शन,असे आवश्यक सामान सामाजिक बांधीलकी जपली आहे.देवगड कोविड केअर सेंटरच्या प्रतिनिधी डॉ रुपाली पोकळे यांच्या ताब्यात दिले आहे.

You cannot copy content of this page