कणकवली शहराने घेतला मोकळा श्वास

नगरपंचायतीने राबविली बॅनर हटाव मोहीम

*💫कणकवली दि.२१-:* कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्गालगत ठीक ठिकाणी लावण्यात आलेले डिजिटल बॅनर हटविण्यात आले.कणकवली नगर पंचायतीकडून सकाळपासून हटाव मोहीम हाती घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी प्रामुख्याने महामार्गलगत हे बॅनर लावून सुंदर शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. सर्रास करून यामध्ये राजकीय पक्षांच्या बॅनरचा जास्त समावेश होता. सकाळी गांगो मंदिर ते नरडवे नाक्या​पर्यंतचे सर्वच बॅनर हटविल्याने शहराने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत आहे. न.प.चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या सुचनेनुसार ही कारवाई कर​ण्यात आली. असून या कारवाईत कर्मचारी प्रवीण गायकवाड, विशाल होडावडेकर आदींनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page