शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते वितरण
*💫वेंगुर्ला दि.२०-:* आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत सुमारे ५ लाख निधीतून वेंगुर्ला पंचायत समितीला देण्यात आलेल्या १० संगणक व ४ प्रिटर यांचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. येथील पंचायत समितीच्या बॅ.नाथ पै सभागृहात हे संगणक व प्रिटर पंचायत समितीचे कनिष्ट सहाय्यक अशोक कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी दिनकर चाटे, कक्ष अधिकारी रेडकर, रविंद्र गावडे, वेदांग पेडणेकर, मसूद शेख, राहुल नरसाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री.पडते म्हणाले की, गेल्या ७ वर्षांपासून पंचायत समितीची संगणकाची मागणी होती ती आमदार दिपक केसरकर यांनी पूर्ण केली आहे. यापुढे पंचायत समीतीच्या नुतन इमारतीतील फर्निचरचा जो प्रश्न आहे तो पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या माध्यमातून मुंबई येथे मंत्रालयात पाठपुरावा करून पूर्ण करू असा शब्दही दिला.
