एज्युकेशन सोसायटीचे संचालक अण्णा म्हापसेकर आणि कुटुंबियांतर्फे वाटप
*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अण्णा म्हापसेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांतर्फे त्यांचा मुलगा श्रील याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवटीकेला पुस्तके आणि खेळणी अशी ११ हजार रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. यावेळी म्हापसेकर कुंबियांतर्फे श्रील, अण्णा म्हापसेकर, अक्षया म्हापसेकर, धिरेंद्र म्हापसेकर, श्री.अविनाश पडते, प्रसाद नार्वेकर, खजिनदार मुकुंद वझे, मुख्याध्यापक नारायण मानकर, बालवाडी शिक्षिका वेंगुर्लेकर उपस्थित होते. संस्थेतर्फे म्हापसेकर कुटुंबियांचे आभार मानण्यात मानून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
