ईडीची चौकशी खुशाल लावा;आम. दीपक केसरकर यांचे आम.नितेश राणे यांना खुले आव्हान
*💫सावंतवाडी दि.२०-:* नितेश राणें यांनी काल माझ्यावर जमीन घोटाळ्या संदर्भात इडी लावण्याची धमकी दिली. आमच्या जमिनी या नितेश राणे यांच्या जन्मापूर्वीच्या आहेत. त्यामुळे ईडीची चौकशी त्यांनी खुशाल लावावी, असे आव्हान आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांना केले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. संजू परब यांच्या विरुद्ध दीपक केसरकर यांनी वक्तव्य केल्याने नितेश राणें यांनी काल केसरकर यांच्यावर टिका केली होती. त्याला आज केसरकर यांनी प्रतिउत्तर दिल आहे. केसरकर म्हणाले, आमदार नितेश राणें यांनी जमीन घोटाळा संदर्भात इडी लावण्याची धमकी दिली, त्यांनी येत्या १५ दिवसात चौकशी लावावी, असा इशाराही आमदार केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांना दिला आहे. आणि जर घोटाळ सापडला नाही तर नितेश राणे यांनी आपले वक्तव्य व्यतव मागे घ्यावे, असेही केसरकर म्हणाले.
