चैतन्य चव्हाण प्रशालेत प्रथम
*💫मालवण दि.१८-:* मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रशाळेतून चैतन्य दत्ता चव्हाण हा विद्यार्थी ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे या प्रशालेमधून ८८ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील १२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. या प्रशालेतून प्रथम – चैतन्य दत्ता चव्हाण (८९.६०%), द्वितीय – मिताली अमित मयेकर (८६.४०%), तृतीय – स्नेहल गणपत मोंडकर (८४.८०%), चतुर्थ – रिया विजय दांडकर (८४.२०%), पाचवी – साक्षी संदेश परब (८४.२०%), सहावा – चिन्मय शैलेश सामंत (८४.००%), सातवा – ओमकार सूर्यकांत मांजरेकर (८२.०४%), आठवा – विराज यशवंत मिठबावकर (८१.६०%), नववी – नितल सत्यविजय मालंडकर (७८.६०%), दहावी – उन्नती भालचंद्र चव्हाण यांनी गुणानूक्रमे यश संपादन केले या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष नि ल मिठबावकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, इतर संस्था चालक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
