श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले यांची पुण्यतिथी साजरी

*💫सावंतवाडी दि.१८-:* संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले याची तृतीय पुण्यतिथी पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्ष राणीसाहेब शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, अॅड. शामराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार वसंत अण्णा केसरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते. राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांनी 1995 ला राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या निधनानंतर श्री पंचम खेमराज महाविद्यालय ची धुरा समर्थपणे सांभाळली त्याचबरोबर येथील हस्तकलेला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली गंजिफा या खेळण्यालाही जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली स्थानिक कलाकारांना रोजगार मिळवून दिला यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनालाही त्यांनी चालना दिली

You cannot copy content of this page