आचरे न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

समृद्धी राणे प्रशालेत प्रथम

*💫मालवण दि.१८-:* आचरे येथील न्यू इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशाळेतून समृद्धी आनंद राणे ही विद्यार्थिनीं ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली या प्रशालेमधून ८८ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील २७ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परिक्षेत ४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली. यात प्रथम- समृद्धी आनंद राणे (९६.६०%), द्वितीय- गौतम रमेश महाजन (९६.४०%), तृतीय- कार्तिका देवेंद्रकुमार टिकम (९५%) यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष नीलिमा सावंत, मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page