*जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत होणार बैठक*
*💫सावंतवाडी दि.१८-:* वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत उद्या सोमवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता स्वामींनी मंगल कार्यालय, पाटणकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि कार्याध्यक्ष विलास गावडे हे तालुक्यातील सर्व जिल्हा, तालुका, व महिला पदाधिकारी, सदस्य तसेच फ्रंटल विभागाचे व सेलचे पदाधिकारी यांना आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी केले आहे.
