अमिषा तिवरेकर शंभर टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम
*💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून अमिषा ओमप्रकाश तिवरेकर हिने शंभर टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला. परीक्षेसाठी प्रशालेतून ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. प्रशालेत प्रांजल शामसुंदर कळसुलकर ९३.८० टक्के गुण मिळवित द्वितीय, मयुरेश तुळशीदास नाईक ९३.६० टक्के गुणांसह तृतीय तर गणेश शंकर खडपकर ९२.२० टक्के गुण मिळवून प्रशालेत चतुर्थ आला आहे. तर सानिका फेंद्रे, गायत्री गावकर, भूमी परब, श्रुती गावकर व गुणवंती बाईत या विद्यार्थ्यांनीही ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक वैजनाथ देवण, स्थानिक कमिटी चेअरमन राजेंद्र परब व शिक्षक वर्गाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
