*💫कणकवली दि०९-:* कोंडये-वरचीवाडी येथील सौ. जयश्री महेश जेठे (४५) यांचे बुधवारी पहाटे ४.३० वाजता ओरोस जिल्हा रूग्णालयात निधन झाले. त्या गेली काही वर्षे आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. कोंडयेतील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयनल-मणेरवाडी येथे माहेर असलेल्या पुर्वाश्रमीच्या कल्पना राजाराम फाटक या महेश जेठे यांच्याशी विवाहबध्द झाल्या होत्या. मनमिळावू स्वभाव व कुटुंबवत्सल म्हणून त्या ओळखल्या जात. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दीर, जावा, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. दै. पुढारीचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या त्या वहिनी होत.
कोंडयेतील जयश्री जेठे यांचे निधन…
