स्पर्धा परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील तनुश्री मसुरकरचे सुयश

*💫कणकवली दि.१७-:* माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी कुमारी तनुश्री प्रसाद मसुरकर हिने ब्रेन डेव्लपमेंट स्कॉलरशिप परीक्षा २०२०/२१ या स्पर्धा परीक्षेत ९३% गुण मिळवून राज्यगुणवत्ता यादित झळकली असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. त्याबद्दल गोरेस् एज्युकेशन फाउंडेशन मार्फत तिला सन्मानपत्र, सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या इंडियन टॅलेंट सर्च ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत देखील गणित विषयात विशेष प्राविण्य मिळवले असून राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे त्याबद्दल सुवर्णपदक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च पुणे, मंथन स्पर्धा परीक्षा, एस टी एस या सहशालेय आधारित स्पर्धा परीक्षेत देखील तिने याआधी घवघवीत यश संपादन केले आहे तिला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली वसाहत प्रशालेचे शिक्षक आणि कनेडी प्रशालेतील शिक्षक वर्ग, आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तनुश्री हिच्या या सुवर्णमय यशानिमित कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीशजी सावंत आणि पदाधिकारी , शालेय समिती चेअरमन एल डी सावंत आणि पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस डी दळवी सर, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page