*💫कणकवली दि.१७-:* कणकवली बाजारपेठेतील रहिवासी सदानंद विठ्ठल बांबूळकर (८०) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले.कणकवली काशीविश्वेश्वर देवस्थानचे सचिव व भालचंद्र महाराज संस्थांचे विश्वस्त होते.शहरातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.त्यांचा स्वभाव मनमिळावू व शांत होता.आंबेआळीत त्यांचे किरणा मालाचे दुकान आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन मुली असा परिवार आहे.हेमंत व प्रसाद बांबूळकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी कणकवली येथील स्मशानभूमती अंत्यसंस्कार करण्यात आले.
भालचंद्र महाराज संस्थांचे विश्वस्त सदानंद बांबूळकर यांचे निधन
