*मदर क्विन्स इंग्लिश स्कूल मधून गिरिधर गावडे ९६.२० टक्के गुणांसह प्रथम*

*💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कुल सावंतवाडीने यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १००% टक्के यश संपादन करत १००% निकालाची परंपरा कायम राखली. कु. गिरीधर अरुण गावडे याने ९६.२०% प्राप्त करून प्रथम तर कु. श्रेया विजय गांवकर हिने ९६.००% प्राप्त करुन व्दितीय तर कु. भावेश चंद्रकांत मुंडये याने ९५.००% पटकावुन तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याचप्रमाणे कु. प्रतिक प्रमोद मडगांवकर ९३.८०%, कु. सानिका संजय केसरकर ८९.८०% यांनी देखील उज्ज्वल यश संपादीत केले. सर्व यशस्वी विदयार्थ्याचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रध्दाराजे सावंत भोसले व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक व विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या |

You cannot copy content of this page