*💫सावंतवाडी दि.१७* तालुक्यातील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा १०० टक्के निकाल लागला असून, कुमारी ऋतिका राजाराम गुरव हिने ९४.६० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक कुमारी तन्वी संजय शेवाळे हिने ९३.२० टक्के, तृतीय क्रमांक कुमारी समीक्षा सावळाराम हरमलकर हिने ९२.६० टक्के, तर चतुर्थ क्रमांक कुमारी आफरिन आश्रफअली खान हिने ९२.२० टक्के गुणांसह पटकावला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय मधून ऋतिका गुरव ९४.६० गुणांसह प्रथम
