राणी पार्वती देवी हायस्कूल मधून जानवी सावंत ९५.४० टक्के गुणांसह प्रथम

*💫सावंतवाडी दि.१७-:* राज्यात १० वी ची परीक्षा रद्द झाल्या नंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून, शहरातील राणी पार्वतिदेवी हायस्कूल, सावंतवाडी शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये जानवी सावंत हिने ९५.४० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर पूजा सरमळकर हिने ९५.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर कुंदन कुडव याने ९४.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.

You cannot copy content of this page