*💫सावंतवाडी दि.१७-:* राज्यात १० वी ची परीक्षा रद्द झाल्या नंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून, शहरातील कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये अंबर गावडे याने ९९.४० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर पूर्वा सावंत हिने ९७.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर मधुरा वाडकर हिने ९७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कळसुलकर हायस्कूल मधून अंबर गावडे ९९.४० टक्के गुणांसह प्रथम
