श्रेया सावंत १०० टक्के गुण प्राप्त करत प्रथम तर ९९ टक्के गुणांसह सिद्धी बिडे व अजिंक्य जाधव द्वितीय
*💫सावंतवाडी दि.१७ -:* राज्यात १० वी ची परीक्षा रद्द झाल्या नंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, शहरातील मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये श्रेया सावंत हिने १०० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर सिद्धी बिडे आणि अजिंक्य जाधव यांनी ९९ टक्के गुणांसह संयुक्त रित्या द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर वैभव मुंडे यांनी ९७.०८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
