डॉ.सतीश पवार हे द्वेषरहित मनाचे वास्तववादी कवी

डॉ. सतीश पवार यांच्या ” टाळतो मी रस्ता गर्दीचा ” ऑनलाइन प्रकाशन

*💫कणकवली दि.१७-:* डॉ सतीश पवार यांच्या ‘टाळतो मी रस्ता गर्दीचा’ या द्वितीय काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज डॉ भा वा आठवले यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. कोविडचे सर्व नियम पाळून प्रकाशन करण्यात आले. देवगडचे कवी प्रमोद जोशी, डॉ अरुण गुमास्ते तसेच डॉ केतकी जामसंडेकर, डॉ रामदास बोरकर, डॉ प्रशांत पोकळे, डॉ रुपाली पोकळे, डॉ प्रसाद बोकील, डॉ सुनील आठवले, डॉ मंजुषा आठवले, सौ रोहिणी आठवले यांनी विविध ठिकाणावरून सहभाग घेतला. हा काव्यसंग्रह इ बुक असून पीडिएफ आणि epub मध्ये मोफत उपलब्ध आहे. Epub साठी प्ले बुक्स हे गुगल प्ले स्टोअरचे अँप वापरावे. पुस्तकाची प्रस्तावना सुयोग पंडित, मालवण यांची असून डॉ मेधा फणसळकर, डॉ गौरी गणपत्ये यांचे मनोगत आहे. अक्षरजुळणी अमर पवार, कळसुली हायस्कूल यांनी केली आहे. मुखपृष्ठ नितांत चव्हाण, एस एम हायस्कूल कणकवली व चिन्मय सरमळकर यांनी केले आहे. तर मलपृष्ठ दिनेश मेस्त्री, कलाशिक्षक जांभवडे हायस्कूल यांनी बनवले आहे. संग्रह नरडवे हायस्कूलच्या दिवंगत कर्मचाऱ्यांना अर्पण केला आहे. डॉ. भा. वा .आठवले हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या मोजक्या सर्जनपैकी असून साहित्यिक सुद्धा आहेत. त्यांचे वय 92 वर्षे आहे. डॉ. सतीश पवार हे कणकवलीत रेडिओलॉजिस्ट आहेत. या काव्यसंग्रहासाठी डॉ धनंजय रासम, शैलेश घाडी, ओमकार तेली, मनाली राणे, मीनाक्षी चव्हाण , माधवी चव्हाण , अदिती केदारे आणि हृतिक मेस्त्री यांनी परिश्रम घेतले. कवयित्री सरिता पवार , कै गझलकार मधुसूदन नानिवडेकर आणि वैशाली पंडित यांनी मार्गदर्शन केले.यावेळी नुकतेच दिवंगत झालेले गझलकार मधुसूदन नानिवडेकर याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

You cannot copy content of this page