आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाचे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.०९-:* आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाच्या वतीने १० डिसेंबर रोजी असणाऱ्या मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधत मानिंजय इंडिया मासिकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात विविध शैक्षणिक संस्थांकडे बस प्रवास खर्चा अभावी येणे शक्य नाही. अशा विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा पास उपलब्ध व्हावा यासाठी फक्त मुलींसाठी साक्षर मुलगी उज्वल भविष्य ही संस्था स्थापन करून या द्वारे मोफत पास सुविधा सुरू करणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाचे प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.