कोलगाव हायस्कूल संगणक चोरीतील संशयिताला अटक

पाच दिवसांची पोलिस कोठडी

*💫सावंतवाडी दि.१६-:* कोलगाव हायस्कूल मधील संगणक चोरी केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली. त्याला आज शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संगणक चोरीचा हा प्रकार १३ जुलै रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर संबंधित प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संबंधिताने तीन संगणक व इतर साहित्य मिळून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला होता. दरम्यान, या चोरीच्या तपासाअंती संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित हा मूळ सांगली येथील असून सध्या तो कोलगाव येथे वास्तव्यास होता. याबाबतची माहिती पोलीस कॉ. महेश पास्ते यांनी दिली.

You cannot copy content of this page