खारेपाटण सहकारी सोसायटीच्यावतीने प्रभाकर पोमेडकर यांना वाहीली श्रद्धांजली

*💫कणकवली दि.१६-:* खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मिमिटेड खारेपाटण या संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन प्रभाकर रामचंद्र पोमेडकर यांचे १३ जुलै रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने खारेपाटण पंचशीलनगर येथे निधन झाले होते.सोसायटीच्यावतीने शोकसभेचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला खारेपाटण सोसायटीचे विद्यमान चेअरमन विजय देसाई,संस्थेचे माजी चेअरमन व जि प सदस्य तथा माजी बांधकाम वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,पंचायत समिती सदस्या तथा संस्थेच्या संचालिका तृप्ती माळवदे, संचालक – एकनाथ कोकाटे,इस्माईल मुकादम,श्रीधर गुरव,सुरेंद्र कोरगावांकर,बलराम बाणे, संस्थेचे सचिव कृष्णा कर्ले आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कै. प्रभाकर पोमेडकर यांच्या प्रतिमेला संस्थेचे चेअरमन विजय देसाई व माजी चेअरमन रवींद्र जठार यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. ” संस्थेच्या एका प्रामाणिक व सच्चा कार्यकर्त्यांला आज आम्ही सर्वचजण कायमचे मुकलो असून कै.प्रभाकर पोमेडकर यांनी खारेपाटण सोसायटी साठी आजर्यंत केलेले काम व त्यांचा आठवणी सदैव आमच्या स्मरणात राहतील.” असे भावपूर्ण उदगार संस्थेचे चेअरमन श्री विजय देसाई यांनी कै.प्रभाकर पोमेडकर श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना काढले.

You cannot copy content of this page