सुरक्षिततेच्या कारणास्तव एका बाजूने वाहतूक केली बंद
*💫कणकवली दि.१६-:* कणकवली येथील उड्डाणपूलावरील एस.एम.हायस्कुल समोरील एका साईटच्या गोव्याकडे जाणारा लेनच्या रस्त्याचा काही भाग खचला. हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.हि बाब आम्ही कणकवलीकरांच्या निदर्शनास आल्यानंतर दिलीप बिल्डकॉनच्या कपंनीचे देखभाल दुरुस्ती विभागाचे सुरपवायझर यांना बोलवून घेत याबाबत जाब विचारला.या वादावर पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी आम्ही कणकवलीकर व दिलीप बिल्डकॉनचे एन.के.सिंग व समर सिंग यांच्याशी चर्चा केली.या संधर्बात प्रांतकार्यालयात योग्य तो तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने या वादावर तात्पुरता पडदा पडला.दरम्यान सुरक्षतेच्या कारणास्तव एका बाजुने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. उड्डाणपुलावरील एका लेनचा भाग खचल्यामुळे दिलीप बिटकॉनकडून याची डागडुजी कण्यात येत होती.हि बाब आम्ही कणकवलीकरचे सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तद्नंतर पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला हे देखील घटनास्थळी दाखल झाले.हि गंभीर प्रकार पाहिल्यानंतर दिलीप बिल्डकॉन कंपंनीच्या दुरुस्ती विभगाचे एन के सिंग व समर सिंग यांना तात्काळ बोलवून घेतले.सुपरवायझर घटना स्थळी दालखल होताच.आम्ही कणकवलीकर संघटनेच्या सदस्यांनी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत व ढिसाळ पणाबाबत प्रश्नाचा भडीमार केला.मात्र संबंधिताककडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने बाळू मेस्त्री हे आक्रमक झाले.मेस्त्रींचा आक्रमक पणा पाहून मुल्ला यांनी यावर तोडगा काढण्यासाठी सुपरवायझर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुल्ला यांनी आम्ही कणकवलीकर संघटनेचे सदस्य व उपस्थित नागरिकांची समजूत काढूली परंतु जो पर्यंत महामार्ग प्राधिकरणकडून या संदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळत नाही.तोपर्यंत त्या लेनवरून वाहतूक बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली.अखेर या प्रश्नी अंतिम तोडगा काढण्यासाठी सायंकाळी ५ वा.प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचे ठरले. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, तहसीलदार रमेश पवार,वाहतूक अधिकारी अरुण जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,नगरसेवक कन्हैया पारकर,मनसेचे दया मेस्त्री, प्रसन्ना देसाई ,रिमेश चव्हाण,पोलीस कर्मचारी कैलास इंपाळ, वाहतूक पोलीस संदेश आबिटकर,आदी उपस्थित होते.
