माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्थांना सबळ करण्यासाठी योगदान द्यावे:मोहन केळुसकर

*💫कणकवली दि.१६-:* गेल्या काही वर्षांत राज्यातील अनुदानित विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये चालविणाऱ्या शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. अशा संस्थांच्या शाळा-महाविद्यालयात शिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी  संघटित होऊन अशा संस्थांच्या उर्जितावस्थेसाठी, आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कोकण विकास आघाडचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केले आहे.

राज्यातील काही शिक्षण संस्थांच्या पदाधिकार्यांच्या सूचनांनुसार केळुसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केळुसकर यांनी हे आवाहन केले आहे.राज्यातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी आपापल्या गावातील, पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची विद्यालयीन, महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची सोय व्हावी,  या उद्देशाने शिक्षण संस्था उभ्या केल्यात. अनेकांनी जमीनी दान केल्यात. काहींनी आर्थिक पदरमोड केली. गाववर्गण्या गोळा केल्यात. त्यातून अशी विद्यालये, महाविद्यालये यांच्या इमारती उभ्या राहिल्या, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणाले, सुरुवातीच्या काळात शिक्षकांचे, कर्मचार्यांचे पगार संस्था चालक अदा करीत असत. तर काही शिक्षक पगार न घेताच विद्यादानाचे काम करीत  असत. यथावकाश शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाने जुन्या शिक्षण संस्थांना अनुदान देण्यास सुरुवात  केली. शिक्षकांच्या पगारासह इमारतीचे भाडे, प्रयोगशाळाचा खर्च आदी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावागावांतील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सुविधा मिळू शकली. तर अलिकडील शिक्षण संस्था मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विनाअनुदानित राहिल्यात. संस्था चालक विद्यार्थांकडून जादा शिक्षण शुल्क आकारून कशाबश्या संस्था चालवित आहेत.
शासनाने हळूहळू या संस्थांच्या इमारतीचे भाडे देण्यासह अन्य सवलती कमी कमी केल्यात. परिणामी इमारती दुरुस्ती, फर्निचर आदींसाठी संस्था चालकांना निधीची वानवा भासवू लागली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तर गेल्या दिड-दोन वर्षांत संस्था चालकांसमोर तर आर्थिक निधी अभावी संस्था चालविणे अवघड झाले आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, अशा योगदान केलेल्या शिक्षण संस्थांमुळे असंख्य माजी विद्यार्थी नोकरी व्यवसायांतून आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत. आता त्यांच्या पुढच्या पिढींना शिक्षणासाठी याच संस्था उपयोगी होणार आहेत. त्यामुळे अशा माजी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन या संस्थांच्या ऊर्जितावस्थेसाठी आर्थिक योगदान उभे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

You cannot copy content of this page