भाजपा महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.१६-:* खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने दहावीचा निकाल आज जाहीर करण्याचे निश्चित केले पण राज्य शासनाची शिक्षणबद्दल असलेली अनास्था आज पुन्हा अधोरेखित झाली. तरी झालेला गोंधळ त्वरित दूर करून लवकरात लवकर निकाल सामान्य माणसास उपलब्ध व्हावा अशी मागणी.भाजप महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व जनता प्रभावित आहे त्यातच दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांची व्यथा आणखीनच बिकट आहे. परीक्षा रद्द केल्याने मूल्य मापन पद्धतीने ह्या वर्षीचा निकाल जाहीर करण्याचे निच्छित करण्यात आले. त्यानुसार आज एक वाजता निकालाची वेळ ठरविण्यात आली. परंतु मागील काही तास सर्व विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक शासनाने दिलेल्या प्रक्षेपण स्थळावरून निकालाची माहिती घेण्याचा प्रयन्त करत आहेत, परंतु कोणत्याच ठिकाणी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे विध्यार्थी तसेच पालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर निकाल जाहीर करून सुद्धा शासनाचा भोंगळ कारभार पुन्हा अधोरेखित झाला आहे. आणि यातून शासन विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरणाचेच काम करत आहे. तरी झालेला गोंधळ त्वरित दूर करून लवकरात लवकर निकाल सामान्य माणसास उपलब्ध व्हावा अशी मागणी केली आहे.
