*कणकवली दि.१६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती तथा पं. स. सदस्य दिलीप तळेकर व सहकार्याने भेट घेत नाम. नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती तथा पं. स. सदस्य दिलीप तळेकर यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, देवगड तालुक्यातील फणसगाव येथील राणे समर्थक महेश उर्फ बंड्या मांजरेकर यावेळी उपस्थित होते. नाम.नारायण राणे एमएसएमई खात्याच्या केंद्रीय मंत्रिपदी सिंधुदुर्गचे लाडके खासदार नारायण राणे यांची नियुक्ती झाल्याचा आनंद सिंधुदुर्गातील प्रत्येक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला आहे. हाच आनंद व्यक्त करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण भेट घेतल्याचे कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले. .
ना.नारायण राणे यांची सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी घेतली भेट
