महागडा मोबाईल परत करीत रिक्षाचालकाने दाखविला प्रामाणिकपणा

*💫मालवण दि.१६-:* मालवण येथील स्टेट बँकेच्या एटीएम समोर पडलेला महागडा मोबाईल रिक्षाचालक महेश गावकर (रा. देऊळवाडा मालवण) यांना सापडल्यावर त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत मोबाईल सापडल्याची खबर व्हाट्सएपद्वारे सोशल मीडियावर फिरविल्यार मोबाईलधारक अंकित धुरी ( रा. धुरीवाडा, मालवण) या तरुणाला त्याचा मोबाईल परत केला. महेश गावकर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मालवण येथील स्टेट बँकेच्या एटीएम समोर पडलेला वन प्लस कंपनीचा सुमारे ४० हजार किमतीचा महागडा मोबाईल रिक्षाचालक महेश गावकर यांना सापडला. मोबाईल सापडल्यावर गावकर यांनी याची माहिती आपल्या मित्रांना देत त्यांच्या माध्यमातून मोबाईल सापडल्याची खबर व्हॉट्सऍपद्वारे सोशल मीडियावर फिरवली. त्यामुळे हा मोबाईल धुरीवाडा येथील अंकित धुरी या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाल्याने महेश गावकर यांनी अंकित धुरी यास त्याचा मोबाईल परत केला.

You cannot copy content of this page