केवळ पाहणीच करून थांबले नाही तर केंद्राचे निकष बाजूला ठेवले:ना.उदय सामंत
मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर त्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौरा जो दौरा केला त्या दौर्यावरून विरोधकांनी टीका टिपणी केली. या टीकेला उत्तर देत केंद्र शासनाचे निकष बदलत जिल्ह्याची जी ४५ कोटी ४९ लाख रुपयांची मागणी होती. ते सर्व पैसे उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे बोलताना केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज येथील दैवज्ञ भवन येथे पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी समन्वयक पूनम चव्हाण, नगरसेविका सेजल परब, मंदार केणी, नितीन वाळके, भाई कासवकर, बाबा सावंत, किरण वाळके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, शिवसंपर्क अभियान हे दरवर्षी राबविले जाते. संघटनात्मक आणि सामाजीक काम करण्यासाठी या अभियानाचा उपयोग केला जातो. शिवसैनिक हा कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविले जात नाही. संघटना वाढविण्यासाठी आणि सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण शिक्षण पद्धती आहे त्यातील चांगल्या गोष्टी करण्यास सुरवात केली आहे. कोकणात सेंटर ऑफ एक्सलेंस (उत्कृष्टतेचे केंद्र) असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून एमएसबीटीच्या फंडातून सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून मालवणातील शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात येत्या दोन महिन्यात एक्सलेंस केंद्र उभारण्यात येणार आहे. यात सहा कोटीची इमारत आणि २४ कोटीचा अत्याधुनिक अभ्यासक्रम असेल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्या अनुषंगाने सहाशे ते सातशे प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने भरता येतील का? याचा विचार सुरू आहे. त्यानुसार यातील काही प्राध्यापक मालवणात दिले जातील. ऑनलाईन शिक्षणाची समस्या आहे. त्याबाबत राज्याचा अपग्रेडेशनचा डीपीआर बनविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी जे पैसे लागतील ते उपलब्ध करून देऊ असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात मुख्यमंत्र्यांनी दौरा करत नुकसानीची पाहणी केली. या दौर्यावरून विरोधकांनी टीका टिपणी केली. या टीकेला उत्तर देत केंद्र शासनाचे निकष बदलत जिल्ह्याची जी ४५ कोटी ४९ लाख रुपयांची मागणी होती. ते सर्व पैसे उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यात तालुक्यात २ कोटी ६५ लाख रुपये मच्छीमारांसाठी, ६ कोटी २३ लाख रुपये हे घरांसाठी २ कोटी ७३ लाख रुपये हे शेतीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली ही नुकसान भरपाई मिळाली असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले तरी त्याचा संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही मात्र कोकणातील व्यक्ती मंत्री झाली आणि त्याच्या माध्यमातून कोकणचा प्रदूषण विरहित विकास होत असेल आणि तो शाश्वत विकास होत असेल तर त्या प्रकल्पाबाबत शिवसेना नागरिकांच्या बाजूने उभी राहिल असे सांगत ना. सामंत म्हणाले वेंगुर्ल्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित नव्हतो प्रसारमाध्यमांच्या माहितीच्या आधारे खासदार विनायक राऊत आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल आपल्याला समजले एखाद्या स्थानिक पातळीवरच्या कार्यक्रमात शिवसेना भाजप युती ठरत नसते तर युतीची बोलणी निर्णय जो आहे तो पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात त्यामुळे वेंगुर्ल्यातील एका कार्यक्रमामुळे युती होणार असे कोणाला वाटत असेल तर त्या वादात मी पडणार नाही अशी टिपणीही ना. सामंत यांनी केली. पर्ससीन मच्छिमारी बाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले दोन दिवसापूर्वी कॅबिनेटची जी बैठक झाली त्या बैठकीत एलईडी पर्ससीन मच्छिमारीला मी विरोध केला असून माझा हा विरोध कॅबिनेट बैठकीच्या रेकॉर्डवर आला आहे. पर्ससीन मच्छिमारीच्या बाबतीत नियम डावलून जर कोणी मच्छिमारी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे त्या बैठकीत मागणी करणारा सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. काहीजण माझ्यावर जे बेछूट आरोप करीत आहेत त्यांनी प्रथम माहिती घ्यावी किंवा त्यांना माहिती घेण्याची इच्छा नसेल म्हणून ते तसे वागत आहेत असेही ते म्हणाले. सिंधुरत्न योजनेत मच्छिम
