बावशी रेशनिंग वरुन आता ग्रामस्थांचे २६ रोजी आमरण उपोषण

*💫कणकवली दि.१५-:* कणकवली तालुक्यातील बावशी ‘जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाला’ रेशनिंग द्यायला दिवसेंदिवस विरोधच होत असून आता या विरोधात थेट प्रांताधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ दिल्यास आम्ही ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मनश्री कांडर व रेशनिंग कार्डधारक ग्रामस्थ २६ जुलै रोजी ग्रा‌.पं.येथेच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून उपविभागीय अधिकारी कणकवली यांना देण्यात आला आहे. बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानसाठी गेल्या वर्षी प्रस्ताव बावशी येथील जय मल्हार महीला बचत गट ने पुरवठा विभाग यांच्या जवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कोरोना काळात पत्रव्यवहार करून सदर गटाने संपर्क न केल्याने कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केला होता यामुळे सदर बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला केले होते. यानंतर नायब तहसीलदार सुजाता पाटील यांनी भेट देऊन पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले होते. परंतु सदर रेशनिंग दुकान आहे त्याच ठिकाणी चालू रहावे अशी बावशीशेळीचीवाडी , गावठण, बौद्धवाडी या सर्वांची मागणी असून सदर गटाला मुदतवाढ देण्यात येवू नये ‌आणि तशी आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावे की, आम्ही मुदतवाढ देणार नाही व तसेच चालू राहील.असे न केल्यास आम्ही ग्रामस्थ २६ जुलै रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आता नांदगाव वि.वि. कार्यकारी सहकारी सोसायटी तोंडवली बावशी फाटा येथे सुरू झाले आहे आणि हे सर्वांना सोईचे आहे जर येथील हलविण्याचा प्रयत्न केला तर २६ जुलै रोजी आम्ही रेशनिंग कार्डधारक आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन पालकमंत्री व प्रांताधिकारी यांचेकडे सादर केले आहे. दुसरी जागा दाखविण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु या दोन ते तीन महिने कालावधीत कोरोनाचा प्रादूर्भाव एवढा मोठा होता की बचत गटाच्या महिला कोरोना बाधीत होत्या यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही ‌आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले या विरोधात तोंडवली बावशी ग्रामपंचायतीच्या आवारात जिल्हा पुरवठा विभाग यांच्या विरोधात आआमरण उपोषण केल्याचे बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता कांडर व इतर महीलांनी बोलताना सांगितले आहे. यामुळे या रेशनिंग दुकानांबाबत काय निर्णय होतो तसेच आता रेशनिंग दुकान चालु आहे तेथेच चालू राहते याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सदर तोंडवली बावशी येथील नागरिकांना तोंडवली बावशी फाटा येथे चार महिन्यांपूर्वी नांदगाव सोसायटीच्या माध्यमातून रेशनिंग दुकान उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते झाले आहे .व येथे सुरू आहे.

You cannot copy content of this page