वेंगुर्ल्यात मुसळधार पावसाने झोडपले…

*💫वेंगुर्ले दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी येथील होडावडा, तुळस भागात पाणी साचले असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात गेले तीन दिवस सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसासोबतच जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सतत पडणारा पाऊस व त्यात वेगाने वाहणारे वारे यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील होडावडा, तुळस, पाल,अणसुर या भागातून जाणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन येथील शेती पाण्याखाली गेली आहे.

You cannot copy content of this page