जंतुनाशक फवारणी करा:महेंद्र सांगेलकर यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी शहरात मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे या पावसाळ्याच्या काळात अनेक रोग राई पसरू शकते. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, शहरात गेले काही दिवस मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगर परिषदेने त्वरित यावर उपाय योजना करावी. जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही. तसेच नाले गटारे देखील शहरातील साफ करण्यात यावेत. अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
