संघर्षाचे दूसरे नाव म्हणजे सेना नेते संदेश पारकर

लोकाभिमुख या नेतृत्वाच्या कार्याचा वाढदिनी घेतलेला आढावा

*💫सिंधुदुर्ग दि.१४ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक अशा सर्वच क्षेत्रात काम करणारे नेतृत्व शिवसेना नेते संदेश पारकर यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक कामाचा घेतलेला आढावा कणकवली कॉलेजच्या जीवनापासून संदेश पारकर यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. त्यानंतर कणकवली ग्रामपंचायत सरपंच, कणकवली नगरीचा पहिला नगराध्यक्ष पदाचा मान संदेश पारकर यांना मिळाला. गेली दीड वर्ष सातत्यपूर्वक शिवसेनेच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी आणि विकास कामासंदर्भात पाठपुरावा करण्याचे काम संदेश पारकर करत आहेत. पद असो वा नसो मात्र जनतेशी बांधिलकी ठेवून संदेश पारकर कार्यरत राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक अशा सर्वच क्षेत्रात शिवसेना नेते संदेश पारकर यांनी काम केले आहे. त्यांची राजकीय वाटचाल कुठल्याही राजकीय वारशातून निर्माण झाली नाही तर ती सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून काम करत असताना संघर्षरुपी वाटचालीतून झालेली आहे. सध्या शिवसेना पक्षात कार्यरत असताना संदेश पारकर राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी सातत्यपूर्वक काम करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला उत्सवी स्वरुप गेली ३० वर्षे प्राप्त करण्याचे काम नेहमीच संदेश पारकर हितचिंतक करत आहेत. त्यामुळेच लोकाभिमुख नेतृत्व असल्याची लोकमान्यता शिवसेना नेते संदेश पारकर यांना मिळाली आहे. संदेश पारकर यांनी रस्त्यावर उतरुन विविध प्रश्न हाताळून सर्वसामान्यांचे नेतृत्व केले. राष्ट्रीय महामार्गाचा ज्वलंत प्रश्न असेल किंवा वीजेचा प्रश्न संदेश पारकर पुन्हा एकदा जनतेशी कनेक्ट होताना दिसले. एकेकाळी संदेश पारकर अशाच प्रकारच्या जनआंदोलनासाठी प्रसिद्ध होते. सुस्तावलेल्या जिल्हा प्रशासनाला आक्रमकपणे भिडुन जनतेच्या व्यथा मांडताना संदेश पारकरांच्या कार्यशैलीतील आक्रमकपणा अनेकदा दिसून आला आहे. संदेश पारकर हा सर्वसामान्य जनतेचा चेहरा आहे. त्यांची युवकांमध्ये आजही क्रेझ कायम दिसून येत आहे. त्यांच्या कारकिर्दीत राजकीय चढउतार अनेक आलेत, मात्र आपल्या कारकिर्दीत संदेश पारकरांना कधीच कार्यकर्त्यांची कमी भासली नाही. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ हा वाढतच राहिला. संदेश पारकर त्याच आत्मविश्वासाने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहेत. कणकवली मतदारसंघात विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह अनुभवायला आजही मिळत आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रश्न असतील किंवा नगरपालिकासाठी लागणारा निधी असेल, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय देण्याच्या दृष्टीने सातत्याने संदेश पारकरांची धडपड असते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील विविध छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी संदेश पारकर घटनास्थळी जाऊन आजही त्या नव्या उमेदीने काम करताना दिसत आहेत. अशा या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वास ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनलचा प्रणाम……

You cannot copy content of this page