वृद्ध महिलेला लूटणाऱ्या संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

१४ पर्यंत पोलिस कोठडी

*💫देवगड दि.१२-:* गवाणे येथील एका वृध्देला धमकावत गळ्यातील चैन व रोख रक्कम लंपास करून पसार झालेल्या तेथिलच संशयित चोरटा दिपक कृष्णा राऊत याला अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गवाणे गावठणवाडी येथील एक ७२ वर्षीय वृध्द महिला घरी एकटीच राहत असून ८ जुलै रोजी पहाटे १ वा.सुमारास तेथिलच संशयित दिपक कृष्णा राऊत यांनी त्यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाच्या बाजुच्या खिडकीतून हात घालून कडी काढून त्याद्वारे घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरात एकट्याच असलेल्या त्या वृद्धेच्या डोकीला हात धरून तु ओरडलीस तर बघ अशी धमकी देवून त्यांचा गळ्यातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची चैन व रोख रक्कम ७०० रूपये लंपास करून तेथून पळ काढला होता. याप्रकरणी त्या वृद्धने तक्रारीवरून पोलिसांनी संशयित दिपक कृष्णा राऊत याच्याविरूध्द भादवि कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. देवगड पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक करून सोमवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.

You cannot copy content of this page