संदेश पारकर;वैभववाडी तालुक्यातील कोरोना योद्धयांचा सत्कार
*💫वैभववाडी दि.१२-:* कोरोना संसर्ग व तौक्ते वादळामध्ये आरोग्य, विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता जी सेवा दिली. ती कौतुकास्पद आहे. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले. वैभववाडी येथील माधवराव पवार विद्यालय येथे तालुक्यातील कोरोना योद्धयांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे,उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, संदेश सावंत, रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, अंबाजी हुंबे, भीमराव भोसले, विकास नावळे, मनोज सावंत, जावेद पाटणकर, गौरी पवार, दिलीप नारकर, संतोष पवार, प्रदीप रावराणे, रोहित रावराणे, बंड्या होळकर, गणेश पवार आदि मान्यवर उपस्थित होते. संदेश पारकर पुढे म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेले दीड वर्षे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना रात्रंदिवस सेवा दिली. त्याच प्रमाणे विज वितरण कंपनी च्या कर्मचाऱ्यांनी तोक्ते वादळानंतर वीज सुरू करण्यासाठी फार मोठी मेहनत घेतली. त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्याच प्रमाणे गावागावतील सरपंच व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कोरोना काळात मोठे योगदान दिले आहे. त्याच प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पक्षा मार्फत विविध उपक्रम राबविले त्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणे योग्य आहे. शिवसेना हा समाजकारण करणारा पक्ष आहे. शिवसेना पक्षाने कोकणातील अनेकांना मोठे केले. तर बाळासाहेबांनी कोकणला राजकिय नेतृत्व दिले आहे. आपण शिवसेनेची ताकद देऊन पक्ष संघटना वाढवून भविष्यात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवू उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. शिवसेना नेते अतुल रावराणे म्हणाले, संदेश पारकर हे गोरगरीब लोकांना हाकेला धावणारा नेता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस हा एक प्रकारचा महोत्सव असतो. त्या दिवशी सामाजिक,सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय उपक्रम राबविले जातात. महोत्सव ही संकल्पना संदेश पारकर यांनी प्रथम नगर पंचायतीत राबविली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द ही संघर्षमय आहे. या वेळी राजू शेट्टे, नंदू शिंदे यांनी आपले विचार मांडले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नील धुरी यानी केले.
