मालावणातील रस्त्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांच्या तक्रारीनंतर सार्वजनीक बांधकामला जाग

उपभियंत्यांनी बजावली ठेकेदारास नोटीस

*💫मालवण दि.०८-:* मालवण मधील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाच्या उपविभाग अभियंत्यांनी सदर कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. खड्डे तात्काळ बुजविण्याची ताकीद या नोटीसीत देण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रस्त्यावरील फाट्यावरती सुओ मोटो याचिका दाखल करून घेताना महत्वपूर्ण निकाल दिला ही रस्त्यावरील खड्डेयांची तक्रार त्या शहरातील सर्वसामान्य नागरिकही सदर खात्याकडे करू शकतो. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दहा दिवसात कारवाई करण्यात आला नाही तर पोलीस विभागाने तीन दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करावा. मुंबई उच्च न्यायालयाचा या निकालाचा हवाला देत मालवणमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी पडलेल्या खड्डयाबद्दल तसेच धोकादायक रस्त्याबद्दल मालवण नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम खाते येथे तक्रार दाखल केली होती. दहा दिवसातही खड्ड्यांवर कारवाई न केल्याने आनंद हुले यांनी मुख्याधिकारी- मालवण नगरपरिषद तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांच्याविरुद्ध मालवण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभाग अभियंत्यांनी डि. आर. कन्स्ट्रक्शन कोल्हापूर व आशिष परब खोठले मालवण या दोन कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. नोटिसीमध्ये रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची ताकीद दिलेली आहे.

You cannot copy content of this page