*💫कणकवली दि.०७-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला खारेपाटण हसोळटेंब- कोंडवाडी येथील रहिवाशी रुपेश सूर्यकांत राऊत यांनी आपली आई कै. सुलभा सूर्यकांत राऊत यांच्या स्मरणार्थ नुकतीच अत्यावश्यक वस्तुरुपी साहित्य देणगी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी खारेपाटण कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधीकारी डॉ.प्रसाद मालंडकर, डॉ.सुजित कदम,ऋषी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. देणगीदार रुपेश राऊत यांनी खारेपाटण कोविड सेंटर करिता कीटकनाशक फवारणी यंत्र,हॅन्डग्लोज १ बॉक्स,डेटॉल बॉटल -१ आदी सुमारे २५०० /- रुपये किमतीचे अत्यावश्यक साहित्य यावेळी दिले. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी देणगीदार रुपेश राऊत यांचे आभार व्यक्त केले.
खारेपाटण कोविड सेंटरला रुपेश राऊत यांची देणगी
