पतपेढीने कर्जाचे व्याज माफ करावे; अनिल राणे, गजानन नानचे यांची मागणी
*💫वेंगुर्ले दि.०७-:* माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मासिक वेतन वारंवार उशिराने मिळत असल्याने जिल्हा पतपेढी ने त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे अशी मागणी जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच तांत्रिक संकुल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2021 पासून चे मासिक वेतन वारंवार उशिरा होत असल्याने सदर कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी असून सर्व कर्मचाऱ्यांकडे जिल्हा माध्यमिक पतपेढी चे कर्ज मोठ्या प्रमाणात असल्याने त्या कर्मचाऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रत्येक महिन्याचा मासिक पगार उशिराने होत असल्याने कर्जा चा हप्ता मुद्दल मध्ये जमा न होता सदर चा हप्ता व्याजात जमा होत असल्याने मुद्दल जसेच्या तसे राहत आहे त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना व्याजाच्या नावाखाली छडीचा मार बसत आहे यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कर्जावरील पतपेढी ने व्याजदर माफ करावे अशी मागणी सर्व सभासदाना मधून होत असून तातडीने यावर निर्णय घेऊन सदर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा . अन्यथा जिल्ह्यातील सर्व सभासद आंदोलन करणार आहेत. सभासदांच्या हिताचा विचार व्हावा अशी मागणी माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष अनिल राणे व जिल्हा सचिव गजानन नानचे यांनी लेखी निवेदनात द्वारे कळविले आहे.
