देवगड ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेन्टीलेटर प्रदान

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सतीश सावंत यानी केली होती मागणी

*💫देवगड दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नाम .सुभाष देसाई यांच्याकडून देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने दोन व्हेंटिलेटर देवगड ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप भगत यांचेकडे प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, माजी सभापती रवींद्र जोगल,व तालुका प्रमुख विलास साळसकर ,मिलिंद साटम, तुषार पेडणेकर,संदीप डोळकर बुवा तारी,जहिर ठाकूर, शहर प्रमुख संतोष तारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page