श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मागणी
*💫सावंतवाडी दि.०८-:* शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारक व ओटेधारकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. या गाळेधारकांना पूर्वी ६०० रुपये भाडे असताना ते भाडे २८०० होणार असून, अनामत रक्कम ४० हजार रुपये एवढी होती ती आता २ लाख ६ हजार एवढी होणार आहे. या भाडे वाढ आणि अनामत रक्कम मधील वाढीचा फटका छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसणार आहे. लॉक डाऊन मुळे हे व्यापारी मेटाकुटीला आले असताना या वाढीमुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे व्यापारी ग्रामीण भागातील असून हे व्यवसाय बंद करून बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचा अड्डा होणार आहे का असा प्रश्न देखील त्यानी यावेळी विचारला आहे. त्यामुळे गाळेधारकांना न्याय द्यावा अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी आमदार दिपक केसरकर यांच्याकडे काल भेट घेऊन केली आहे.