*💫सावंतवाडी दि.०८-:* मळेवाड-कोंडुरे येथील माजी उपसरपंच अर्जुन (तात्या) मुळीक यांच्या पुढाकाराने कोंडुरे येथे ‘तिमिरातुनी तेजाकडे’ हा मार्गदर्शनपर उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून पार पडला. कोकणातील विद्यार्थ्यांचे विविध पदांवर निवड होऊन शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही स्वप्नातील संकल्पना सत्यात उतरवून युवक, युवतीं, विद्यार्थ्यांच्या मनात हा उपक्रम रुजविण्यासाठी कोंडुरे येथे हा मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात आल. यावेळी विद्यार्ध्यांचे करियर तसेच शिक्षणाच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा, मालवणी व्याख्यान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मनोबल व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो नक्कीच यशस्वी होईल. यामुळे.’तिमिरातुनी तेजाकडे’.ही चळवळ प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच या चळवळीमुळे प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळून भविष्यात अधिकारी, कर्मचारी स्वरूपात त्यांची निवड होऊन , शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. हा कार्यक्रम शासनाचे नियम पाळून घेण्यात आला. यावेळी तिमिरातुनी तेजाकडे चळवळीचे प्रमुख मार्गदर्शक सत्यवान रेडकर, मळेवाड-कोंडुरेचे माजी उपसरपंच अर्जुन मुळीक, प्रकाश सावंत, आनंद गवस यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला गावातील युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोंडुरे येथे तिमिरातुनी तेजाकडे मार्गदर्शनपर उपक्रम
