अन्यथा भाजपा छेडणार आंदोलन माजी जि. प.सदस्य चंदू मळीक यांचा इशारा
दोडामार्ग।वैभव साळकर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातील मृतदेह ठेवण्याची वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने गैरसोय होत आहे .याची दखल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घ्यावी अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा चे नेते चंदू मळीक यांनी दिला आहे येथील ग्रामिण रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन कक्षात बसविण्यात आलेली वातानुकूलित यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे . त्यामुळे शवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह ठेवताना गैरसोयींना सामोरे जावे लागते परिणामी त्याचा नाहक त्रास वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी व मयताच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची दखल घेऊन नादुरुस्त असलेली वातानुकूलित यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून देण्याचे निर्देश संबंधित आरोग्य विभागास द्यावेत अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाइल असा इशारा श्री.मळीक यांनी दिला आहे